अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महाड तालुक्यात सर्वाधिक 22 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत उमदवरी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर होती. या मुदतीत एक हजार 429 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. मुरूड तालुक्यात एक, पेण दोन, उरण एक, खालापूर एक, माणगाव तीन, महाड 22, पोलादपूर नऊ, श्रीवर्धन चार, म्हसळा सात अशा एकूण 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. येत्या 18 डिसेंबर रोजी 190 ग्रामपंचयातींमध्ये मतदान होईल.
बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामापंचायती
मुरुड ः तेलवडे, पेण ः मळेघर, पाटणोली, उरण ः घारापूरी, खालापूर ः गोरठण बुद्रूक, माणगाव : टोळ खूर्द, फळसप, करंबेळी, महाड ः खुटील, कोंझर, पुनाडेतर्फे नाते, वाळण खुर्द, दादली, नागाव, पिंपळवाडी, रूपवली, मोहोत, निगडे, दापोली, राजीवली, कुर्ले, चिंभावे मोहल्ला, पाचाड, रातवळी, शिरसवणे, वडवली, केंबुर्ली, फाळकेवाडी, चांभारखिंड, कुंबळे, पोलादपूर : उमरठ, कोतवाल खुर्द, कोतवाल बुद्रुक, गोळेगणी, परसूले, पार्ले, पैठण, कापडे खुर्द, ओंबळी, श्रीवर्धन ः कुडकी, गुळधे, मेघरे, रानवली, म्हसळा ः कांदळवाडा, कारसोली, निगडी, फळसप, कणघर, खरसई, रेवळी.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …