Breaking News

‘समृद्धी’च्या फोटोग्राफीचा लक्ष्मण ठाकूर यांना मान

पनवेल : रामप्रहर वृत्त

विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गाची शासकीय फोटोग्राफी दै. रामप्रहरचे छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर व सहकार्‍यांनी केली आहे.

लक्ष्मण ठाकूर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे चार दिवस टीमसमवेत समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी टप्प्याची फोटोग्राफी करण्यासाठी गेले होते. या टीमने संकलित केलेल्या फोटो व माहितीचा समावेश असलेले एक समृद्ध प्रवास : गाथा विकासाच्या मार्गक्रमणाची हे कॉफी टेबल बुक पंतप्रधान मोदींना लोकार्पण सोहळ्यात भेट देण्यात आले. याबद्दल लक्ष्मण ठाकूर यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply