Breaking News

उलवे येथे बाळासाहेबांच्या शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन

उरण : प्रतिनिधी, बातमीदार

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उरण विधानसभा संघटक कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यालयाचे उदघाटन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख तथा कर्जत खालापूर विधानसभा मतदान संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी उलवे येथील स्थानिक ग्रामस्थांवर, भूमिपुत्रांवर कसा अन्याय झाला हे सांगत उलवे मधील सर्व ग्रामस्थांचे, भूमीपुत्राचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उलवे मधील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवू असे अभिवचन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन व पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याचे उत्तम नियोजन केल्याने महेंद्र थोरवे यांनी सर्वांचे कौतूक करत आभारदेखील मानले. मेळाव्यामध्ये उरण पनवेल तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्ष प्रवेश केला. उरण तालुक्यातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मुख्यमंत्री कोअर कमिटीमधील सदस्य रूपेश पाटील, उरण विधानसभा संघटक-कृष्णा पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक मनोज घरत, उलवे शहर अध्यक्ष प्रभाकर पाटील, वहाळ ग्रामपंचायत संघटक रामदास पाटील तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. नाना गडकरी यांनी महाराष्ट्र गीत तर कवी पुंडलिक म्हात्रे यांनी आपल्या गीतातून स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यथा मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply