Breaking News

माथेरानमध्ये ई-वाहने आणल्यास कारवाई

पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांची माहीती ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी

कर्जत : विजय मांडे
माथेरानमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सात ई – रिक्षा सुरू झाल्या असल्याने अनेक पर्यटकांना वाटते आता माथेरानमध्ये ई – वाहन चालवायला हरकत नाही म्हणून एका पर्यटकाने ई – वाहन आणले. त्याच्यावर कर्जत न्यायालयात जाऊन दंडात्मक कारवाई झाली आहे. माथेरानमध्ये वाहनांवर बंदी आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांनी किंवा कुणीही ई – वाहन असो की, कोणतेही वाहन असो आणू नये, अशी माहिती प्रतिनिधीशी बोलताना माथेरानचे पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी दिली. माथेरान पर्यटनस्थळी ब्रिटिश काळापासून वाहनांना बंदी आहे. त्यामुळे रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहिका वगळता अन्य कोणत्याही वाहनांना संपूर्ण बंदी आहे. मात्र माथेरान शहरात ई – रिक्षा यांचा प्रवास सुरू असल्याने पुणे येथील पर्यटकाने आपले ई वाहन माथेरानमध्ये आणले. दरम्यान,या प्रकाराने माथेरान मधील अश्वपालाला संतप्त झाले असून पोलिसांनी त्या पर्यटकाला ई – वाहनासह पोलीस ठाण्यात नेवून कारवाई केली. माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून तेथील प्रदूषण रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घातली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी घालून दिलेला हा नियम आजही सुरू असून माथेरान हे जगातील वाहनांना बंदी असलेले एकमेव शहर आहे. तसेच ब्रिटिशांनी येथील लाल मातीचे रस्ते आणि निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी केलेला हा नियम राज्य सरकार कडून पाळला जात आहे. मात्र माथेरान मधील शालेय विद्यार्थ्यांना काही किलोमीटर प्रवास करून पायपीट करीत आणि पाठीवर आठ ते दहा कीलोचे ओझे सांभाळत जावे लागत आहे. ही बाब माथेरान मधील शिक्षक सुनील शिंदे यांनी शासनाच्या आणि न्यायालयाच्या लढाईत तब्बल 12वर्षांनी यश मिळविले आणि माथेरान मध्ये सर्वोच्य नायायलायाच्या आदेशाने राज्य सरकारने पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यांनतर माथेरान मध्ये 5 डिसेंबर पासून ई रिक्षा सुरू झाली असून ई रिक्षा मधून प्रवास करण्यासाठी माथेरान मध्ये पर्यटक आवडीने येत आहेत. ई – रिक्षामुळे पर्यटकांची संख्या कमालीची वाढ झाली असून माथेरानमध्ये आपले स्वतःचे देखील ई वाहन नेवून त्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न काही पर्यटकाचा दिसून आला आहे. 6 जानेवारी रोजी पुणे येथून माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेला पर्यटकाने आपले ई वाहन गाडीमधून आणले आणि कार माथेरानच्या दस्तूरी येथे पार्किंग करून माथेरान गावात प्रवास सुरू केला. त्यावेळी दस्तुरीं येथील वाहन तळ असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना शहरात नेता येणार नाही. असे सांगणे गरजेचे होते. मात्र पार्किंग सांभाळणारे वन विभाग,प्रवासी कर संकलन करणारे केंद्र येथील नगरपरिषद कर्मचारी आणि ई रिक्षा स्टँडवरील कर्मचारी यांच्यापैकी कोणीतरी याबाबत त्या पर्यटक प्रवाशाला सूचना करणे गरजेचे होते. मात्र कोणीही लक्ष दिले नसल्याने शेवटी हा पर्यटक आपल्याकडील ई वाहन घेवून मुख्य शहरात पोहचला.
त्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वाट पाहणारे अश्वपाल असतात,त्यांनी देखील आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे पर्यटकांचे ते वाहन थेट माथेरान गावात पोहचले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वादाला तोंड फुटले असून पर्यटकाच्या या कृतीबद्दल माथेरान पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस बाजारात पोहचले आणि त्यांनी त्या पर्यटकाला त्याच्याकडील ई वाहनांसह पोलीस ठाण्यात नेले. मात्र या प्रकाराने माथेरान मध्ये संतापाची लाट पसरली असून प्रामुख्याने ई – रिक्षा मुळे आपला व्यवसायावर गदा आली म्हणून आधीच नाराज असलेला अश्वपाल या प्रकाराने अधिक संतप्त झाला आहे.
माथेरान पोलिसांनी ई-वाहन आणलेल्या पर्यटकावर कारवाई करताना त्याला कर्जत न्यायालयात हजर करून त्याच्यावर न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली.

Check Also

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावाची लवकरच घोषणा होईल -मुख्यमंत्री

पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले …

Leave a Reply