मुंबई : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीत बोहरा मुस्लीम समाजाकडून उभारण्यात आलेला अल जमिया तस सैफिया विद्यापीठाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी आतापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महिनाभरातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा दौरा असेल. 19 जानेवारी रोजी मोदी मुंबईत अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी मुंबईत आले होते. पंतप्रधानांनी मेट्रो 2 आणि मेट्रो 7 मार्गिकेचे उद्घाटन केले होते.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper