पनवेल : पैसे देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केले असून दुसर्या आरोपीचा शोध सुरू आहे.
पीडित महिला ही ओरियन मॉलसमोरील हॉटेलमधून मध्यरात्री सुमारास बाहेर पडली असता दोन अनोळखी व्यक्तींनी तिला पैसे देण्याच्या बहाण्याने रेल्वे स्टेशनजवळील नवीन पनवेल हद्दीत पंचशिल नगर येथील एका पडक्या इमारतीमध्ये घेऊन गेले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला मारहाण करून तिथेच सोडून निघून गेले. यानंतर पीडितेेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पथकाने गुप्त बातमीदारांकडून व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अविनाश चव्हाण (वय 20, रा. पंचशील नगर, नवीन पनवेल) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याचा साथीदार सूरज देवडे उर्फ वाकड्या (रा. पंचशील नगर) याचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper