उरण : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सांगुर्ली ग्रुप ग्रामपंचायतीचे शेकापचे विद्यमान सरपंच पद्माकर कातकरी यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप नेते मंगेश वाकडीकर, विद्याधर जोशी, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य शरद वांगीलकर, संतोष पारधी, सुवर्णा जगदीश पाटील, सदस्य जगदीश पाटील, माजी सरपंच राजेंद्र माटे, विष्णू ठोकळ, केशव ठोंबरे, संजय पोपेटा, परेश ठोंबरे, विवेक भोईर, वसंत ठोंबरे, योगेश पाटील, यशवंत हातमोडे, निलेश वांगीलकर, विशाल गायकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख अॅड. निलेश हातमोडे, राकेश वांगीलकर, संतोष वाजेकर, रवींद्र कातकरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी चिंचवण गावाचे अमित तुकाराम पाटील, परशुराम पाटील, चंद्रकांत नथू पाटील, तुकाराम कानू पाटील, संजय परशुराम पाटील, शशिकांत पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
Check Also
निराधारांच्या योजनांचे अनेक प्रस्ताव मंजुरीअभावी प्रलंबित
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील निराधार …
RamPrahar – The Panvel Daily Paper