मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन
रेवदंडा ः प्रतिनिधी
सत्ता कोणाचीही असली तरी आम्ही विकासकामांचा वेग थांबवणार नाही, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बालत होते. काकळघर, मांडला ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या 15 ते 20 गावांना मांडला पुलाच्या नूतनीकरणामुळे फायदा होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मांडला पुलाची दूरवस्था झाल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत निवेदनही देण्यात आले होते. त्याचा आमदार महेंद्र दळवी यांनी पाठपुरावा करून मांडला पुलासाठी नाबार्ड अंतर्गत नूतनीकरण बांधकामासाठी 95 लाखांच्या निधीस मंजुरी मिळविली आहे. त्यानुसार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी महिला जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रद्धा ठाकूर, सुभाष महाडिक, शिंदेगट शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे, जिल्हा शांतता कमिटी सदस्य निलेश घाटवळ, असगरशेठ दळवी, प्रफुल्ल मोरे, सी. एम. ठाकूर, काकळघरचे सरपंच स्वस्तिक ठाकूर, मांडलाचे सरपंच सुचिता पालवणकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पालवणकर, माजी सरपंच शैलेश रातवडकर, विभाग प्रमुख साक्षी गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश रातवडकर यांनी केले, तर सूत्रसंचलन धर्मेद गायकवाड यांनी केले. आमदार महेंद्र दळवी यांचे स्वागत फटाक्याच्या आतषबाजीने व बँजोपथकाचे तालावर करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी यांनी, अलिबाग ते मुरूड तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. महाविकास आघाडी असो अथवा नसो, येथील कार्यकर्त्यांचे मनोमिलन राहिल. केंद्रात व राज्यात कोणाची सत्ता असेल, मात्र येथील आमदार लोकांच्या मनातील असेल, असे म्हटले.
RamPrahar – The Panvel Daily Paper