पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील वाजे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे गणेश किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाजे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक सोमवारी (दि. 20) झाली. या निवडणुकीत गणेश किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भुपेंद्र पाटील, वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेश भोईर, माजी सरपंच अंजनी राजेंद्र भालेकर, माजी उपसरपंच राजेंद्र भालेकर, तंटामुक्ती अध्यक्ष राघो पाटील, सदस्य रेवन पाटील, पदू वाघ, मथुरा पाटील, भारती भालेकर, कमला कातकरी, काली कातकरी, लक्ष्मीबाई झुंगरे, राम कातकरी, मदन पाटील, गणपत पाटील, रूपेश भोईर, यशवंत पाटील, सिताराम जळे, दशरथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.