उरण : बातमीदार
कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे ह्यांचा वाढदिवस कर्जत, खालापूर आणि उरण तालुक्यात शुक्रवारी (दि. 7) मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. उरण तालुक्यात त्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले.
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा शिवसेना उरण विधानसभा संपर्कप्रमुख रूपेश पाटील ह्यांनी उरणमधील रानसई कातकरी वाडी येथे आदिवासी बालकांसाठी शालेपयोगी साहित्य आणि खाउचे वाटप केले. तसेच दैनंदिन गरजेसाठी आधार कार्ड नोंदणी पॅनकार्ड तसेच रेशन कार्डची सध्याची असलेली गरज व त्या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती बाबत जनजागृती करून नोंदणी केली. असे विविध सामाजिक कार्यक्रम उरण तालुक्यात आयोजित केले गेले. शिवसेना शाखा, जसखार तालुका उरण यांच्या उत्साही सहभागाने कार्यक्रम झाला.
कार्यक्रम रुपेश पाटील ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी उरण तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी विभागप्रमुख गणेश घरत, शाखाप्रमुख अमित ठाकूर, ग्रामपंचायत जसखार उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे, सदस्या हेमलता भालचंद्र ठाकुर, सूर्यकांत ठाकूर, नितीन पाटील, हर्षल ठाकूर, तेजस घरत आदी शिवसैनिक उपस्थित होते. तसेच माजी उपसरपंच महेश कातकरी, सुनील जोशी, नामदेव ठाकूर हे सामाजिक कार्यकर्ते आणि विंधने ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …