Breaking News

चिखलेच्या उपसरपंचपदी भाजपच्या निकिता पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील चिखले ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भारतीय जनता पक्षाच्या निकिता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच निकिता पाटील यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. चिखले ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वतो प्रयतक् करणार असल्याचे आश्वासन यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिले. या वेळी सरपंच नामदेव पाटील, सदस्य रवींद्र गडकरी, रमेश गडकरी, विनायक पाटील, योगेश पाटील, सूर्यकांत पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष हिरामण पाटील, राम फडके, मछिंद्र पाटील, संजय शेळके, निलेश गायकर, विजय पाटील, नामदेव पाटील, भूषण पाटील, दत्ता म्हात्रे, भालचंद्र पाटील, आदिनाथ पाटील, दिनेश पाटील, जयदास पाटील, सुबोध पाटील, बळीराम भोपी, पद्माकर म्हात्रे, राजू घरत, निलेश भोपी, अनिल भोपी, निलेश पाटील, दत्त पाटील, राजेंद्र पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply