Breaking News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पनवेल :बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी छत्रपती साहू महाराज यांची शनिवारी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त मार्केेट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शाहू महाराज यांच्या प्रतिमेस भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी के. सी. पाटील गुरुजी, मोतीलाल कोळी, शिवकर ग्रामपंचायत सरपंच आनंद ढवळे, सावळे उपसरपंच सुनील माळी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमधील बेघर निवारा प्रकल्पाची महापालिका सदस्यांकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या वतीने सेक्टर १२, प्लॉट क्रमांक २ए येथे उभारण्यात येत असलेल्या …

Leave a Reply