Breaking News

जुन्या भांडणाचा राग मनात  धरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण 

पनवेल : वार्ताहर

जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका इसमाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पनवेल तालुक्यातील पेंधर गावात घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कमलेश लालबाबू सिंह (वय 41, रा. पेंधर, मुळ गाव बिहार) यांचा बिहार येथील आपल्या मूळ गावी आरोपी पप्पुकुमार रामअवदेश सिंह (वय 30), देवकुमार रामकेश्वर सिंह (वय 32) यांच्यासोबत भांडण झाले होते. याचा राग मनात धरून दोघांनी कमलेश सिंह याला लाकडी दांडक्याने व हाताचापटाने मारहाण करुन शिवीगाळी केली तसेच तुला इथे राहून देणार नाही अशी धमकी दिली. या मारहाणीत कमलेश याच्या डोक्यात डाव्या बाजुला मारुन तो जखमी झाला आहे.

याप्रकरणी तळोजा पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण करीत आहेत.

Check Also

दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…

एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …

Leave a Reply