पनवेल ः वार्ताहर
दहशतवादी कारवायांशी संबंधित आणि शासनाने बंदी घातलेल्या पीएफआय संघटनेच्या समर्थनार्थ मेसेज लिहून सोबत दोन सुतळी बॉम्ब ठेवल्याचा प्रकार नवीन पनवेलमध्ये समोर आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 19मधील निलांगण सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजावर पीएफआय संघटना जिंदाबाद असा मेसेज आणि 786 हा नंबर घराबाहेर लिहिण्यात आला आहे. सोबतच दोन सुतळी बॉम्ब ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती रहिवाशांनी दिल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. हे सर्व करणार्याचा शोध पोलीस घेत आहेत.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper