पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत जुनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीतील परीक्षेत दिमाखदार यश मिळविले आहे. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दहावीच्या परीक्षेत रोशन अण्णा शिंदे या विद्यार्थ्यानेे 94.80% गुण प्राप्त करून प्रथम, प्रथमेश रामसिंग चौहानने 90% गुण मिळवत द्वितीय आणि सार्थक संजय नाईकने 88.80% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर बारावीच्या परीक्षेत ऋतुराज भास्कर नवाळे याने 73% गुण प्राप्त करून प्रथम, नाझिया खातून फारूक चौधरी याने 67.17% गुण मिळवत द्वितीय, तर आयुष अमर म्हात्रे याने 67% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या विद्यार्थ्यांचे कौतुक करतेवेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, शाळेचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका प्रणिता गोळे उपस्थित होते.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper