Breaking News

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी (दि. 18) आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर केला. यानिमित्ताने महायुतीने अलिबागमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अलिबाग-रेवदंडा बायपास येथे चिंतामणराव केळकर विद्यालयासमोरील मैदानात महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, आमदार योगेश कदम, आमदार अनिकेत तटकरे, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सभेला जिल्हाभरातून महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सर्व नेत्यांनी आपल्या भाषणात खासदार सुनील तटकरे यांना मोठ्या फरकाने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply