Breaking News

मोदीजी, अख्खा देश तुमच्यासोबत : सचिन तेंडुलकर

मुंबई ः प्रतिनिधी

भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष विश्वचषक स्पर्धेकडे आहे, पण याच दरम्यान भारताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारला निवडून दिले. सात टप्प्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल 23 मे रोजी लागला. यात जवळपास 350 जागांवर भाजपने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर सर्व स्तरातून पंतप्रधान मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही मोदींना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनने ट्विट करीत पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. नरेंद्र मोदीजी, लोकसभेत तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल तुम्हाला व भाजपला मनःपूर्वक शुभेच्छा. उज्ज्वल व सशक्त नव्या भारताच्या बांधणीसाठी अख्खा देश तुमच्या पाठीशी आहे, असे ट्विट सचिनने केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply