Breaking News

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि खान्देश सामाजिक विकास संस्थेचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच खान्देश सामाजिक विकास संस्थेने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
खान्देश सामाजिक विकास संस्थेने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे, तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठिंबापत्र सुपूर्द केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही तेली समाजाची राज्यस्तरीय संस्था असून मागील 40 वर्षांपासून राज्यात कार्यरत आहे. देशस्तरीय तसेच राज्यस्तरीय झालेल्या ठरावानुसार महासभेने भाजप महायुतीच्या उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने महासभेचे अध्यक्ष रामदास तडस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने पनवेल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला असून तालुका अध्यक्ष सुनील खळदे, कार्याध्यक्ष तुकाराम किरवे, सचिव प्रवीण धोत्रे, महिला अध्यक्ष रत्नप्रभा पिंगळे, कोकण विभाग कार्याध्यक्ष गणेश धोत्रे यांनी पाठिंबापत्र दिले.
खान्देश सामाजिक विकास संस्थेनेही आपला समर्थन देत मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासद आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खंबीर पाठीशी असल्याची ग्वाही दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष भरत थोरात, सचिव दिलीप अहिरे, खजिनदार एस.एन. वाघ, सदस्य गणपत थोरात उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply