पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांनी कधीही धर्मभेद न करता सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकत्रित येऊन होऊ घातलेल्या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 15) केले.
‘आमदार प्रशांत ठाकूर अंगार है, बाकी सब भंगार है’च्या जयघोषात पनवेल कोळीवाड्यातील कोळेश्वर विद्यामंदिर शाळेसमोर त्यांचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, उद्योजक इकबाल काझी, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकीद काझी, पापा पटेल, भाजप शहर उपाध्यक्ष अमित ओझे, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रितम म्हात्रे, जवाद काझी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper