पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 आयोजित करण्यात आला असून त्या अंतर्गत 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता कामोठे येथे रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून विजेत्यांना भरघोस रकमेची बक्षिसे असणार आहेत.
कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा पुरुष व महिला अशा गटात होणार आहे. यामध्ये पुरुष गटातील प्रथम क्रमांकाला सात हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये व चषक; तर महिला गटातील प्रथम पारितोषिक सात हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये व चषक तसेच प्रत्येक फेरीतील विजेत्या संघाला रोख एक हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणीची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी विद्या तामखडे (9920648773), हरजिंदरकौर हॅपी सिंग (9323185866), वनिता पाटील (9221277116), नितीन कवडे (9768493333) किंवा अजय मोरे (9930382060) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper