Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेलमध्ये रेबीज निर्मूलन उपक्रमाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
रेबीजचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत झिरो रेबीज निर्मूलन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (दि.27) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले.
या वेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने, पशुवैद्यकीय अधिकारी सर्वश्री डॉ. भगवान गीते, डॉ. मधुलिका लाड उपस्थित होते.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार्‍या या कार्यक्रमांतर्गत नॅशनल अ‍ॅक्शन प्लान फॉर डॉग मेडिऐटेड रेबिज एलिमिनेशन फ्रॉम इंडिया बाय 2030या शासनाच्या कार्यक्रमाच्या धरतीवर रेबीजचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये झिरो रेबीज निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी पालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची अँटीरेबीज लसीकरण व लोकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
श्वान चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच, जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. रेबीजमुळे जगभरात होणार्‍या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. रेबीज अतिघातक व्हायरल रोग आहे. एकदा रेबीज श्वान चावल्यावर त्यावर कुठलाही उपाय नाही. रेबीज झाल्यावर त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यासाठी मनुष्याप्रमाणे श्वानांना अँटीरेबीज लसीकरण करणे हा एकमेव उपाय आहे.
श्वानांच्या लसीकरण करण्याकरिता ईनिविदेद्वारे युनिवर्सल निमल वेलफेअर संस्थेस परवानगी देण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 17 हजार 500 भटक्या श्वानांना अँटी रेबीज लसीकरण वॉर्डनिहाय करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने रेबीज निर्मूलनकरिता लवकरच इंटिग्रेटेड डॉग बाईट मॅनेजमेंट प्रोटोकॉल, मॉडेल अ‍ॅन्टी रेबीज क्लिनिक स्थापित करण्यात
येणार आहेत.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply