Breaking News

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सोमवारी (दि. 10) ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना त्यांनी, कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून भारतीय जनता पक्ष यासाठी कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.
म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास माजी नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस व मेळाव्याचे आयोजक अनिल जाधव, विभागीय अध्यक्ष शैलेश गायकवाड, अंकुश गायकवाड उपस्थित होते. या वेळी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली तसेच उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात माजी नगरसेवक नितीन पाटील यांची युनियनचे सल्लागार म्हणून, तर युनियन कार्यालय प्रमुख म्हणून महेंद्र गायकवाड यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
ऑल इंडिया फायर सर्व्हिसेस स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फायर सर्व्हिसेस मीट 2025मध्ये मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलातील शुभांगी घुले व तेजश्री साळुंखे यांचा तसेच अग्निशमन विभागातील पहिल्या महिला वाहनचालक कम ऑपरेटर गीतांजली पाटील यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष दत्तगुरू म्हात्रे यांनी मानले.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply