मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार आणि विधान परिषदेतील भाजपचे गटनेते तथा मुंबै बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाची प्रारंभिक बैठक शुक्रवारी (दि. 2) मुंबईतील गृहनिर्माण भवन येथे झाली.
या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड, आमदार स्नेहा दुबे पंडित, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडाचे सीईओ मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते.
या वेळी पुनर्विकास प्रकल्पांच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली असून येणार्या काळात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे.
Check Also
‘एसआयआर’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper