Breaking News

भाताणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्रुप ग्रामपंचायत भाताण व भाताण पाडा गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ भाजपचे नेते, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्याची टाकी, स्वप्नील भोईर ते अनिल काठावळे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी. गटार, सभामंडप, नथुराम भोईर ते रमेश घोगरे यांच्या घरापर्यंत रस्ता व आर.सी.सी गटार या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत माजी नगरसेवक बबन मुकादम, सरपंच तानाजी पाटील, माजी सरपंच चंद्रकांत भोईर, भाजप गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, कर्नाळा मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, तानाजी खंडागळे, प्रवीण ठाकूर, माजी उपसरंपच गणेश गाताडे, रोहित घरत, दिपक ठाकूर, अरुण पाटील, अनिल काठावळे, किरण मुकादम, स्वप्निल भोईर, महेंद्र गोजे, रूपेश ठाकूर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply