Breaking News

जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांच्यात सामाजिक कार्याची अंगभूत जाणीव -लोकनेते रामशेठ ठाकूर

जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रितम म्हात्रे हे समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 22) येथे केले.
पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटीमध्ये भारतीय जनता पक्ष श्री. प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ‘दिबा’साहेबांचे पुत्र अतुल पाटील, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, जगदीश पवार, माजी नगरसेवक बबन मुकादम, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, कर्नाळा मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, न्हावे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, रामेश्वर आंग्रे, बळीराम पाटील, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, पुष्पलता मढवी, सीमा घरत, सरस्वती काथारा, लीना पाटील, रमाकांत म्हात्रे, गौरव कांडपिळे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगात सर्वात चांगला नेता म्हणून नाव आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सक्षमपणे नेतृत्व करीत असल्याचे सांगितले. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष शेवटी स्वतः असे भाजपचे तत्व आहे. त्यामुळे देशप्रेम प्रथम अशी महत्त्वाची मूल्य असून भारतीय जनता पक्षात काम करेल त्याला संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
10 मे रोजी प्रवेश झाला; आज 22 मे, पण तुम्ही थांबलात नाही. अवघ्या दहा-बारा दिवसांत तुम्ही भाजपची मूल्ये आत्मसात केली असे सांगतानाच प्रितम म्हात्रे धडाडीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याला पुढे मोठी संधी आहे. पूर्वी शेकाप-भाजप म्हणून आमचे मतभेद झाले, पण जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे हे राजकारणविरहित काम करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत कधीही दुजाभाव झाला नाही, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले. खुर्ची कामाकरिता असते, मानाकरिता नाही. या कार्यालयात मुख्य खुर्ची प्रितम म्हात्रे यांची असणार आहे, मात्र ते खुर्चीत न बसता उभे आहेत, असे सांगत त्यांनी कौतुक केले.
पनवेलमध्ये भाजपची तीन मुख्य कार्यालये झाली आहेत तसेच प्रत्येक नगरसेवकाचे व्यक्तिगत कार्यालय आहे. आता आणखी मोठे कार्यालय डेरवली येथे होत आहे. या कार्यालयातून लोकांची सेवा कायम झाली पाहिजे. त्यासाठी सर्वानी एकदिलाने काम करायचे आहे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. जो काम करेल तो पुढे जाईल. त्यामुळे आपले कुटुंब सांभाळत पक्षाचे आणि प्रामुख्याने देशहिताचे सर्वांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी प्रितम म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच आपल्या भाषणातून पक्षाचे कार्य अधिक जोमाने करण्याचा मानस व्यक्त केला. आमदार विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचीही भाषणे झाली, तर प्रास्ताविक माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केले.
या वेळी शेकापचे खांदा कॉलनी अध्यक्ष जयंत भगत, कामोठे शहर प्रमुख संघटक अल्पेश माने, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, शुभांगी खरात, खांदा कॉलनी महिला अध्यक्ष निर्मला गुंडरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

Check Also

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक

विविध विषयांवर विचारविनिमय पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक …

Leave a Reply