Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतूनकोप्रोली व भानघर येथे विकासकामे

  • भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन
    पनवेल ः रामप्रहर वृत्त
    पनवेल तालुक्यातील कोप्रोली आणि भानघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून सुमारे 72 लाख रुपयांची विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) झाले.
    पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली 50 लाख रुपयांच्या निधीतून भानघर ते चिंचवली फाट्याकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण, तर 12 लाख रुपयांच्या निधीतून चिपळे गु्रप ग्रामपंचायतीमधील कोप्रोली गावच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरण व 10 लाख रुपयांच्या निधीतून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.
    या कार्यक्रमास भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष अमित जाधव, भाजप नेरे जि.प. विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, शांताराम पोपटा, रमेश पाटील, प्रकाश तांडेल, नितीन पोपेटा, माजी उपसरपंच गणेश म्हस्कर, मुकेश फडके, धनंजय पाटील, रोशन पोपटा, प्रितेश डांगरकर, पोलीस पाटील दीपक पाटील, मदन मढवी, हिराजी पोपेटा रघुनाथ मोहिते, सागर मढवी, सुनील मढवी, जगन पोपेटा, नारायण हरिभाऊ माळी, नारायण बाळाराम माळी, अंकुश पाटील, अशोक फडके, संतोष म्हसकर, गुरूनाथ ठाकूर, धनंजय म्हसकर, लक्ष्मण फडके, रोशन पाटील, रोहित पाटील, नागेश म्हसकर, सावळाराम डांगरकर, महेश शहा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply