Breaking News

‘दिबां’ना अभिवादन; उपोषण स्थगित

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील येऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत केंद्र सरकारने उद्घाटनापूर्वी अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी कामगार नेते आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी 24 जून 2025 रोजी जासई येथील हुतात्मा स्मारकाजवळ सुरू केलेले आमरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सरबत पिऊन स्थगित केले.
प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि.बा.पाटील यांचा 12वा स्मृतिदिन मंगळवारी होता. याचदिवशी कॉम्रेड भूषण पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. तसेच दुपारच्यादरम्यान उपोषणस्थळी जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, वाय. टी. देशमुख, दि.बा.पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, दीपक म्हात्रे, जे. डी. तांडेल, कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र म्हात्रे, सीमा घरत, नंदराज मुंगाजी, सुधाकर पाटील, नीलेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या वेळी दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी नामकरणाबाबतची सद्यस्थिती स्पष्ट केली आणि विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशीच नामकरण होईल, असा विश्वास व्यक्त केला. नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही अतुल पाटील यांच्या भूमिकेला दुजोरा दिला. उपस्थित सर्व मान्यवरांनी केलेल्या विनंतीनुसार, कॉम्रेड भूषण पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा
निर्णय घेतला.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply