पनवेल : रामप्रहर वृत्त
तालुक्यातील कोंडीचीवाडी येथे गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या मोठ्या पुलाचे उद्घाटन शनिवारी (दि. 19) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. त्यांनी चिपळे पुलाचे उद्घाटन करतेवेळी कोंडीचीवाडीच्या पुलाचेही उद्घाटन करत असल्याचे सांगितले.
उद्घाटन समारंभाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, माजी पं.स. सदस्य राज पाटील, प्रल्हाद केणी, अंकुश पाटील, दिनेश खानावकर, रमेश पाटील, कृष्णा पाटील, धना पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, वाजे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र भालेकर, माळडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरमुडे, माजी उपसरपंच काळुराम वाघे, जोमा निरगुडे, पद्माकर चौधरी, चाहूशेठ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उषा वारगडा, माजी ग्रामपंचायत सदस्य तनुजा दोरे, चिपळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील, राजेश भोईर, नारायण मढवी, कमळ चौधरी, किसन चौधरी, विकास भगत, हर्षदा चौधरी, विष्णू सपरा, श्याम भालेकर, विष्णू पारधी, माही कडवी, लक्ष्मण चौधरी, गणेश शीर, दिलीप पाटील, किसन चौधरी, कमळू चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात प्रत्येक गाव आणि आदिवासीवाडी रस्त्याच्या माध्यमातून जोडली जात आहे. आज कोंडीचीवाडीला बांदेवाडीपासून जोडणार्या पुलाचे उद्घाटन झाले याचा मनापासून आनंद झाला. यासाठी मी रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचेही आभार व्यक्त करू इच्छितो. त्यांनी या विकासकामाला चालना दिली आणि चार कोटी रुपयांचा हा पूल इथे उभा राहिला आहे.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper