मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
भिंगारी येथे असलेल्या पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यभरात विविध विकास कामांना चालना दिली जात आहे. यामध्येच पनवेल विधानसभा क्षेत्रात आज कोट्यवधी रुपयांच्या कामांचे उद्घाटन मला करताना आनंद होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने ही कामे मुदतीच्या वेळेआधीच केल्याने मी अधिकार्यांचे कौतुक करतो, असे प्रतिपादन यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले. पनवेलकरांच्या दृष्टिकोनातून आज महत्त्वाचा दिवस आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघात होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा शिवेंद्रराजे भोसले पुढे नेत आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध विकास कामांना चालना मिळाली आहे, असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी उद्घाटनावेळी व्यक्त केले. शासकीय विभाग असला तरी या शासकीय इमारतीला कॉर्पोरेट कार्यालयाचा लुक सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला आहे त्यामुळे आता शासकीय कार्यालय आपली कुस बदलत आहेत, असे मत या उद्घाटनावेळी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमोघ ठाकूर, भार्गव ठाकूर, पी.पी खारपाटील, मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, दिनेश खानावकर, सुमित झुंजारराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमित जाधव, विचुंबे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद भिंगारकर, अनेश ढवळे, योगेश लहाने, यांच्यासह अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेल महापालिकेच्या सभागृह नेतेपदी अॅड. प्रकाश बिनेदार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे अनुभवी नगरसेवक अॅड. प्रकाश बिनेदार यांची निवड …
RamPrahar – The Panvel Daily Paper