पुस्तकांचे आपल्या जीवनामध्ये महत्त्व -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त
नागरिकांना आधुनिक सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करत असून नागरिकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये भव्य ग्रंथतुला आणि मंगळागौर कार्यक्रमावेळी केले, तर या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही या वेळी या कार्यक्रमांचे कौतुक करून पुस्तकांचे आपल्या जीवनात असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले.
भारतीय जनता पक्ष कळंबोलीच्या वतीने लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विविध पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याच्या केलेल्या सूचनेनुसार त्यांची ग्रंथतुला करण्यात आली तसेच यावेळी महिलांसाठी मंगळागौर या कार्यक्रमाचे आयोजन कळंबोली सेक्टर 11 येथील आई माता मंदिर हॉलमध्ये करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस चारुशीला घरत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, अॅड. मनोज भुजबळ, बबन मुकादम, तेजस कांडपिळे, राजू शर्मा, कळंबोली माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, माजी पं.स. सदस्य रत्नप्रभा घरत, वर्षा प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण पाटील, जिल्हा चिटणीस संदीप म्हात्रे, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक मोटे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, उपाध्यक्ष संदीप भगत, सुनील ढेबरे, जोहेब पटेल, विनोद बोरसे, सचिव राजेंद्र बागल, केशव यादव, मनीषा निकम, सुनीता हिरवळे, सरस्वती काथारा, अपर्णा सरोज, ज्येष्ठ नेते गुरूनाथ ठाकूर, प्रभाग अध्यक्ष घनश्याम शर्मा, प्रकाश शेलार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, कळंबोली शहर अध्यक्ष गौरव पवार, युवा नेता अमर ठाकूर, दिलीप बिष्ट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper