Breaking News

स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये ’व्होकल फॉर लोकल’ अंतर्गत विविध वस्तूंचे प्रदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमान महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये निरनिराळे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी ’व्होकल फॉर लोकल’ शीर्षकाखाली विविध वस्तूंचे प्रदर्शन शहरातील गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले असून या दोनदिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुनील घरत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, भाजप सरचिटणीस अमरीश मोकल, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, नीता माळी, वृषाली वाघमारे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, गौरव कांडपिळे, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, महिला मोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष राखी पिंपळे, शहर सरचिटणीस सपना पाटील, उपाध्यक्ष सुहासिनी केकाणे, नीता मंजुळे, मयुरी उनटकर, आदिती मराठे, सोनाली पवार, सपना ठाकूर, अनिता रणदिवे, अंजली इनामदार, सोनाली सावंत, सांस्कृतिक सेल जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, जितेंद्र वाघमारे, ज्येष्ठ नागरिक सेल शहर संयोजक उपेंद्र मराठे, रघुनाथ बहिरा, महेश सरदेसाई, चंद्रकांत मंजुळे, अप्पा शिंदे, अक्षय सिंग, शिवाजी भगत, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देशातील प्रत्येक नागरिकाने स्थानिक वस्तू म्हणजे स्थानिक उत्पादने खरेदी करावीत. आपल्याला लोकलसाठी व्होकल बनायचे आहे. स्थानिक वस्तूंचा वापर करायचा आहे. याशिवाय स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमानही बाळगायचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा, असे आवाहन या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
देशाला जगात ताकदवान बनविण्याचे काम करणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी वचनबद्ध आहेत. ते अंत्योदयाचा संकल्प देत देशातील गोरगरीब, शोषित व वंचित वर्गाच्या कल्याणाकरिता देशसेवेचे ध्येय साध्य करीत विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत असतात. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवात्मक, रचनात्मक, व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व अशा विविध सेवाकार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी ’व्होकल फॉर लोकल’ शीर्षकाखाली दोनदिवसीय वस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून याचा लाभ कार्यकर्ते आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply