Breaking News

समाजसेवेचा मार्ग यशापर्यंत घेऊन जातो -लोकनेते रामशेठ ठाकूर

स्वच्छतादूतांना रेनकोट, टिफीन बॉक्स वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त
पैसा महत्त्वाचा नसून सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे मी जे सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये मला जास्त आनंद मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या तत्वांचे पालन हे आमदार प्रशांत ठाकूर करतात आणि त्यांचे मार्गदर्शन घेत भाजपचे तरुण कार्यकर्ते समाजसेवा करत आहेत. हा मार्ग आपल्याल यशापर्यंत घेऊन जाणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वच्छता दूतांना रेनकोट आणि टिफीन बॉक्स वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले.
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामजिक उपक्रम राबण्यात येत आहेत. त्यापार्श्वभुमीवर भारतीय जनता युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 14 यांच्या वतीने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यामध्ये महत्त्वाची भुमीका बजवाणार्‍या स्वच्छता दूतांसाठी रेनकोट व टिफीन वाटपाचा कार्यक्रम सोमवारी पनवेल शहरातील बावन बंगला येथे आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला असून त्यांनी स्वच्छतादूतांना रेनकोट आणि टिफीन बॉक्सचे वाटप केले.
या कार्यक्रमाला लोकनेते दि.बा.पाटी यांचे सुपूत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, मुकीत काझी, माजी नगरसेविका सारिका भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमीत झुंझारराव, शहर सरचिटणसि अमित ओझे, रुपेश नागवेकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रशांत शेट्टे, गणेश म्हात्रे, शुभम कांबळे, उज्वला पाटील, प्रभाग 14 चे युनीयन अध्यक्ष शरद कांबळे, ओमकार सुर्वे, ओमकार डाकी, वास्तव चव्हाण, स्वयम चव्हाण, नील ठक्कर, मैत्रेय जोशी, विकास टाक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply