उरण ः वार्ताहर
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने बेरोजगारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन शहरातील डॉ.श्री. नानासाहेब विष्णू धर्माधिकारी शाळा, पेन्शनर पार्क येथे रविवारी (दि. 17) करण्यात आले होते. या मेळाव्यास तरुण-तरुणी उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात नामांकित 30 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आणि अकुशल अशा विविध शैक्षणिक पात्रतेचे हजारो उमेदवार मेळाव्यात सहभागी झाले. अनेक उमेदवारांनी आधीच ऑनलाइन अर्ज भरले होते. मेळाव्यात घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये 72 उमेदवारांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऑन द स्पॉट ऑफर लेटर देण्यात आले. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला. या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्याचे कौतुक केले. आमदार महेश बालदी यांनी हाती घेतलेले काम चांगलेच होते. त्यामुळे त्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यातून परिसरातील इच्छुक उमेदवारांना काम मिळेल, असे ते म्हणाले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की, आमदार महेश बालदी यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. चांगले काम कसे करावे, कामाची आखणी कशी करावी हे त्यांना अवगत आहे. त्यांनी हाती घेतलेले काम उल्लेखनीय असते. रोजगार मेळाव्याच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी, आमदार महेश बालदी यांनी चांगले काम केले आहे. येथे मुलाखत दिलेल्या उमेदवारांना रोजगार मिळेल. मुलाखत देताना आत्मविश्वास पाहिला जातो. तो वाढवा. पुढे काही अडचण आल्यास सहकार्य करू, असे सांगितले.
या मेळाव्याला भाजपचे राज्य परिषद सदस्य रवी भोईर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, माजी जि. प.सदस्य राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर घरत, जीवन गावंड, कामगार नेते सुधीर घरत, सुरेश पाटील, जितेंद्र घरत, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, मेघनाथ तांडेल, सीमा घरत, माजी नगरसेवक कौशिक शाह, राजेश ठाकूर, नवीन राजपाल, माजी नगरसेविका जान्हवी पंडित, प्रियांका पाटील, रजनी कोळी, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, शहराध्यक्ष संपूर्णा थळी, युवा मोर्चा शहराध्यक्ष निलेश पाटील, भाजप तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, सरचिटणीस सुनील पाटील, राजू ठाकूर, हितेश शाह, मनन पटेल, अतुल ठाकूर, शैलेश गावंड, प्रतिक गोंधळी, मेघनाथ तांडेल, सुशांत पाटील, अनंत घरत, कुणाल शिसोदिया, गौरव कोळी, देवेंद्र घरत, संदीप पानसरे, शमिता ठाकूर, सुप्रिया म्हात्रे, संगीता पाटील, गौरी मंत्री यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, उमेदवार मोठ्यरा संख्येने उपस्थित होते.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper