पनवेल : रामप्रहर वृत्त
आजच्या काळात संस्कारांची नितांत आवश्यकता आहे. संस्कारांशिवाय मिळवलेली विद्या फार काळ टिकत नाही. ज्याच्याकडे संस्कारांचे अधिष्ठान असेल, त्याच्याकडे विद्या अधिकाधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या 11 व्या वर्धापन दिनावेळी केले.
पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा 11 वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. हा भव्य सोहळा ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये शनिवारी पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या संचालिका अॅड. सुरेखा प्रशांत भुजबळ यांनी केले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल विधानसभा आमदार, प्रशांत ठाकूर आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे व्यवस्थापक संदीप वाळके, फॉरेन्सिक लॅब ऑफिसर संपदा दाते, माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, रायगड-भूषण, गुरुवर्य प्रसाद सुतार, अॅड. सरोज गोंधळी, अॅड. सुरेश धाकड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या वेळी स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत, तबला, पेटी, गिटार आणि नृत्य अशा विविध कलांचे सादरीकरण केले. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमातून भारतीय संगीत आणि नृत्य कलांना प्रोत्साहन देण्याची आणि त्यांचे जतन करण्याची विद्यालयाची बांधिलकी दिसून आली.
Check Also
कळंबोलीत स्व. अजितदादांची शोकसभा; मान्यवरांची वाहिली श्रद्धांजली
कळंबोली : रामप्रहर वृत्तअजितदादा आजही आपल्यात आहेत हीच भावना सर्वांच्या मनात आहे. आपल्या कामाच्या झपाट्यामुळे …
RamPrahar – The Panvel Daily Paper