पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडको नोडमधील पनवेल महापालिकेमार्फत पहिल्या पुनर्विकास बांधकाम परवाना मंजूर झालेल्या दीप बिंदिया या नवीन पनवेल येथील गृह प्रकल्पाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 3) झाले.
प्रियल ग्रुप आणि कांडपिळे ग्रुप यांच्या वतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुजाता भगत यांनी विधीवत गणेशाची पूजा करून या प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, शकुंतला ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी कृष्णदेव जाधव, पनवेल पालिकेचे माजी सीईओ बालाजी खतगावकर, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, उपाध्यक्ष गणेश कडू, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अजय कांडपिळे, अनिल भगत, तेजस कांडपिळे, सोसायटीचे चेअरमन सुनिता धुंदरे, सेक्रेटरी सचिन भोजने, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, कांडपिळे ग्रुपचे कृपेश कांडपिळे, प्रियल ग्रुपचे जयेश गांधी आदी उपस्थित होते.
या गृह प्रकल्पाला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. आज दीप बिंदिया इमारतीचा पुनर्विकास अधिकृतरीत्या सुरू झाला असून त्यामागे आमदार ठाकूर यांचे अथक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरले आहेत, असे या वेळी संजय भगत यांनी सांगितले.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper