आमदार प्रशांत ठाकूर यांची आयुक्त मंगेश चितळे यांना सूचना
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे कामगार, कर्मचारी आणि अधिकार्यांना सन 2025चा सानुग्रह अनुदान वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर यांच्यासह पदाधिकार्यांनी भेट घेऊन चर्चा केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी संपर्क साधून सानुग्रह अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ करावी, अशी सूचना केली आहे.
या भेटीत, विशेषतः शिक्षण विभाग आणि एनयुएचएम विभागातील कर्मचार्यांच्या सानुग्रह अनुदानामध्येही वाढ करण्याची मागणी केली. या वेळी काही कर्मचारी सेवानिवृत्तीमुळे आवश्यक असलेले कामाचे दिवस पूर्ण करू शकत नसतील, तरी त्यांना सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवू नये. या कर्मचार्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनाही लाभ मिळावा यावर सकारात्मक चर्चा झाली.
या चर्चेवेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव, कोषाध्यक्ष दत्तगुरू म्हात्रे, कार्यालय प्रमुख महेंद्र गायकवाड, संजय जाधव, मुकेश वाघेला, श्री. राणे, रवींद्र गायकवाड, मनोज कांबळे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper