Breaking News

रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठायोजनांची अंमलबजावणी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना

अलिबाग : प्रतिनिधी
केंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची आढावा बैठक शुक्रवारी (दि.12) अलिबागमध्ये पार पडली. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी चर्चेत भाग घेऊन योजना पूर्ण होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. योजना बांधून पूर्ण झाल्या तरी त्यातून पाणीपूरवठा होणे महत्वाचे आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
या बैठकीला राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता समितीचे अध्यक्ष तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक मोरे यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले की, यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना येणार्‍या अडचणींचा उल्लेख करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे विविध विषयांसंदर्भातील निवेदन सादर केले. तर आमदार रविशेठ पाटील यांनीही विविध सूचना केल्या.
जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. योजना अपूर्ण का आहेत याची तालुकावार माहिती घेण्यसाठी एक बैठक आयोजित करावी. ज्या योजनांची कामे अपूर्ण आहेत त्या योजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना खासदार धैर्यशील पाटील यांनी संबंधीत अधिकार्‍यांना केल्या.
जलजीवन मिशन योजनेद्वारे पाणीपुरवठा योजन राबविण्यात येत आहे. या योजनेतून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. याबाबत या बैठकीत सविस्तर आठावा घेण्यात आला. किती योजनांची कामे सुरू आहेत. त्यापैकी किती कामे पूर्ण झाली आहेत. ज्या योजनांची कामे अपूर्ण आहेत त्याची कारणे काय आहेत याबाबतची माहिती या बैठकीत घेऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

अधिकार्‍यांना जबाबदारीने काम करावे -खासदार धैर्यशील पाटील

या बैठकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी, केंद्र सरकार पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योनांपैकी ज्यांची कामे अपूर्ण आहेत ती कामे तातडीने पूर्ण कराव्यात. प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व शुद्ध पाणी वेळेत पोहचविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. केवळ कागदावर योजना पूर्ण दाखवू नका, लोकांच्या हंड्यात पाणी पोहोचले का? असा थेट सवाल करत अधिकार्‍यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply