Breaking News

भाजप पनवेल दक्षिण मंडळ पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवनियुक्त पदाधिकार्‍यांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे त्यांनी सोने करावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्यावेळी केले तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळेलेली प्रत्येक जबाबदारी योग्यरित्या बजावल्यास येणार्‍या निवडणुकांमध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला; तर आमदार महेश बालदी यांनी समाजाच्या ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकार्‍यांवर आहे, असे प्रतिपादन केले.
भाजप पनवेल दक्षिण मंडळातील सर्व पदाधिकार्‍यांचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा बुधवारी (दि. 17) कर्नाळाजवळील हद्दीतील विसावा रिसॉर्टमध्ये झाला. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्या वेळी ते बोलत होते.
भाजपच्या पनवेल दक्षिण मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सरचिटणीस सुनील गवंडी, प्रफुल पाटील, उपाध्यक्ष सुनील माळी, संजय टेंबे, शेखर पाटील, प्रवीण खंडागळे, रोहन म्हात्रे, शेखर कानडे, चिटणीस विजय मुरकुटेे, मनोज पवार, महिला चिटणीस सुनिता चितळे, सपना वारके, शर्मिला माळी आणि संगीता टाकळे यांचा समावेश आहे.
याचबरोबर मंडळ मोर्चा, सेल आणि प्रकोष्ठ आघाडीच्या अध्यक्षपदीही अनेक पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महिला मोर्चा अध्यक्ष रेखा माळी, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर शेलार, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष महादेव कांबळे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिनेश पाटील, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष अकलाक बडे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष भरत वाघे, किसान मोर्चा अध्यक्ष आत्माराम हातमोडे, दक्षिण भारतीय सेल अध्यक्ष मुथुरम मोटियापोईलन, कामगार आघाडी अध्यक्ष लक्ष्मण म्हात्रे, जैन प्रकोष्ठ अध्यक्ष धीरज जैन, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष दिनेशमहाराज मते, सहकार सेल अध्यक्ष रमेश मोरे, सोशल मीडिया सेल अध्यक्ष सुबोध ठाकूर, आयटी सेल अध्यक्ष भरत जुमलेदार, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष लक्ष्मण बावधने, सांस्कृतिक सेल अध्यक्ष कांता गावंड, वाहतूक सेल अध्यक्ष प्रितेश मुकादम, आयुष्यमान भारत सेल अध्यक्ष तानाजी पाटील, बेटी बचाव बेटी पढाव सेल अध्यक्ष निशा घरत, व्यापार आघाडी अध्यक्ष दीपक म्हात्रे, मच्छीमार सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, वैद्यकीय सेल अध्यक्ष अनिकेत इनामदार, शिक्षण सेल अध्यक्ष अनिल पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष शांताराम मालुसरे, दिव्यांग सेल अध्यक्ष सुजित पाटील, कायदा सेल अध्यक्ष जितेंद्र जाधव, क्रीडा प्रकोष्ठ अध्यक्ष अतुल माळी, उद्योग आघाडी अध्यक्ष राम गाताडे, पदवीधर प्रकोष्ठ अध्यक्ष संतोष माळी, पंचायतराज व ग्रामविकास अध्यक्ष गीतांजली गाताडे यांचा समावेश आहे. इतरही मान्यवरांची नियुक्ती झाली आहे. या सर्व पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या सोहळ्याला भाजप नेते राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, किरण माळी, संतोष पाटील, बाळू पाटील, अविनाश गाताडे, विद्याधर जोशी, हभप अनंता पाटील, जगदीश पवार, जीवन म्हात्रे, रेश्मा माळी, कसळखंडचे सरपंच संजय घरत, रजनी ठाकूर, रंजना गायकवाड, सुशील ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply