पनवेल : रामप्रहर वृत्त
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था घडवली आणि त्यांचा आदर्श घेऊन घडलेल्या वारसदारांनी ही संस्था मोठी केली, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी (दि.25) उलवे येथे जयंत्तीच्या कार्यक्रमात केले तसेच येत्या काळामध्ये सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल हे नवी मुंबईतील प्रथीत यश स्कूल म्हणून उज्वल यश संपादन करणार असा विश्वास व्यक्त करुन कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जायाचे आहे, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
उलवे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल सीबीएससी व मराठी माध्यम विद्यालयाच्यावतीने पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 जयंती आणि पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, महेंद्र घरत, प्रमुख वक्ते दिनेश सासवडे, मॅनेजिंग कॉन्सिल सदस्या ज्योत्स्ना ठाकूर, सीबीेएसई विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, मराठी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर, अनंता ठाकूर, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर, धीरज ओवाळेकर, राजेश खारकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रमुख वक्ते दिनेश सासवडे यांनी अण्णा चा जीवनप्रवासाचे वर्णन आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श लोकांनी घ्यावा असे प्रतिपादन करत कर्मवीरांचे खरे वारसदार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शब्दसुमनांनी कौतुक केले. या सोहळ्यामध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना विविध बक्षीस देऊन स्नमानीत करण्यात आले.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper