उरण ः रामप्रहर वृत्त
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण ठरलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 95वा वर्धापन दिन गुरुवारी (दि.25) होता. या निमित्ताने पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी चिरनेर येथे जाऊन सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन केले.
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य रवी भोईर, उरण ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, सहखजिनदार सुशांत पाटील, ज्येष्ठ नेते राजा खारपाटील, पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, सरपंच भास्कर मोकल, सदस्य समीर डुंगीकर, गाव अध्यक्ष जयेश खारपाटील, प्रतिक गोंधळी, रमेश फोफेरकर, देवेंद्र पाटील, निलेश गावंड, करण ठाकूर, मयूर म्हात्रे, सुशिल पाटील, कुंदन परदेशी, मनोज खारपाटील आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे व इतर सर्वपक्षीय नेतेमंडळींनी हुतात्म्यांना अभिवादन केले, तर पोलीस दलाकडून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.
Check Also
टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …
RamPrahar – The Panvel Daily Paper