Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या सोहळ्यास कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे, ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सचा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. 27) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. या वेळी पनवेलचे नाव उंचवणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे, तर वर्धापन दिनानिमित्ताने ‘विकासाचं आंतरराष्ट्रीय शहर-पनवेल..’ या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply