उरण : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, केंद्र सरकारनेही लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याला सकारात्मकता दर्शवली असून नाव देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल, असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. ‘दिबां’ंच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही नाव नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान आमच्यावर अनेक केसेस दाखल झाल्या. त्या काळात आम्ही आमचे सहकारीही गमावले आहेत, असे सांगून जेव्हा आम्ही पाच वर्षे आंदोलन करत होतो, तेव्हा हे लोक कुठे होते? असा प्रश्न उपस्थित करीत आमदार महेश बालदी यांनी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर टीका केली.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे यासाठी आम्ही आग्रही -मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. …
RamPrahar – The Panvel Daily Paper