ज्येष्ठ नेते, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पाले बुद्रुक येथील शेकापचे ज्येष्ठ नेते हिराशेठ तांडेल, दशरथ वास्कर, विद्यमान सरपंच निखिल तांडेल, उपसरपंच पप्पू पारधी आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 16) भारतीय जनता पक्षाचे विकासात्मक कमळ हाती घेतले आहे.
पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजप राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नवागतांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी बोलताना अरुणशेठ भगत यांनी, आपण सर्वांनी एकजुटीने काम करून आपल्या भागाचा विकास करूया, असे प्रतिपादन केले.
आपल्या भाषणात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शेकापवर टीका करत म्हटले की, आधी मोठ मोठ्या घोषणा करायच्या आणि निवडणूक जवळ आली की मात्र सेटलमेंट करून मोकळे व्हायचे अशी शेकापची आजवर भूमिका राहिली आहे, पण अशा प्रकारचे राजकारण जास्त काळ चालत नाही. भाजपमध्ये काम करणार्यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते, प्रोत्साहित केले जाते. जो विश्वास ठेवून आपण पक्षप्रवेश केला आहे तो सार्थ ठरेल, सर्वांना योग्य तो सन्मान दिला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी नवागतांना दिली.
पक्षप्रवेश कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, एकनाथ देशेकर, भाजपचे पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, प्रकाश खैरे, कृष्णाशेठ पाटील, बुधाजी मोरावकर, दीपक उलवेकर, माजी सरपंच कमला देशेकर, अविनाश उलवेकर, सदस्य लक्ष्मण उलवेकर, शिवराम उलवेकर, नाथाशेठ आगलावे, जनार्दन आगलावे, माजी उपसरपंच कुसूम उलवेकर, सविता उलवेकर, अंकुश पाटील, अरविंद गोंधळी, भास्कर आगलावे, योगेश आगलावे, चंद्रकांत गोंधळी, माजी सदस्य प्रमोद भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते हिराशेठ तांडेल, दशरथ वास्कर, वासुदेव तांडेल, बाळाराम पवार, रघुनाथ तांडेल, प्रभाकर तांडेल, पांडुरंग फडके, सरपंच निखिल तांडेल, उपसरपंच पप्पू पारधी, माजी सरपंच दिलीप वास्कर, माजी सदस्य सोमनाथ पारधी, प्रशांत पवार, महेश पवार, अजय पवार, मुका पारधी, रामा भगत, धर्मा भगत, अंकुश पारधी, भुर्या भगत, सुरेश तांडेल, मोहन बारशे, त्रिंबक तांडेल, मनोहर तांडेल, रवींद्र तांडेल, गुरूनाथ तांडेल, गुरूनाथ उलवेकर, दर्शना पवार, प्रिती पवार, शुभदा पवार, मनिका पवार, गंगुबाई पारधी, सुमन पवार, तुषार तांडेल, नितेश पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते रामा भगत, अंबी भगत, अनंता भगत यांच्यासह पाले बुद्रुक, फणसवाडी आणि कोळवाडीमधील शेकापच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper