Breaking News

भाजपतर्फे रक्तदान आणि आरोग्य शिबिर उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका उत्तर मंडळ आणि दिनेशदादा खानावकर युवा मंच नावडे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी रक्तदात्यांचे कौतुक करून कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी भाजपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नावडे येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वैद्यकीय अरोग्य शिबिर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून अनेक नागरीकांनी आरोग्य तपासणी आणि रक्तदान केले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
या शिबिरावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भुपेंद्र पाटील, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, महेश पाटील, प्रकाश खैरे, अंकुश पाटील, राजेश पाटील, आनंद सोनवणे, मिलिंद झुरे, अविनाश सिंग, राजेंद्र गोंधळी, युवामोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या वेळी पनवेल तालुका उत्तर मंडळ युवा मोर्चा उपाध्यक्षपदी प्रल्हाद गायकर, सरचिटणीसपदी विशाल घरत, आणि तळोजा ओवे शहर अध्यक्षपदी रोहित तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून अभिनंदन केले

Check Also

कळंबोलीत स्व. अजितदादांची शोकसभा; मान्यवरांची वाहिली श्रद्धांजली

कळंबोली : रामप्रहर वृत्तअजितदादा आजही आपल्यात आहेत हीच भावना सर्वांच्या मनात आहे. आपल्या कामाच्या झपाट्यामुळे …

Leave a Reply