वकिलांसाठी एकोप्याने काम करण्याच्या शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल बार असोसिएशनने सर्व सदस्यांच्या हिताला प्राधान्य देत एकोप्याने काम करावे आणि वकिलांसाठी अधिकाधिक सुविधांचा विस्तार करावा, अशा शुभेच्छा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल बार असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीला दिल्या.
पनवेल बार असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदी रत्नदीप पाटील, उपाध्यक्षपदी सचिन म्हात्रे, सचिवपदी अॅड. प्रल्हाद खोपकर, सहसचिव (महिला राखीव)पदावर दिपाली गावंड, खजिनदारपदी धनराज तोकडे, सहखजिनदारपदी विशाल डोंगरे आणि ऑडिटरपदी भूषण म्हात्रे विजयी झाले. कार्यकारिणी सदस्य म्हणून विजयेंद्र मुंढे आणि इर्शाद शेख, तर महिला राखीव सदस्य म्हणून ज्योती राऊत-उरणकर व छाया म्हात्रे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत मनोज भुजबळ यांच्या पॅनलमधील आठ पदाधिकारी विजयी झाले असून दोन्ही बाजूंनी दिलेला लढा अत्यंत सकारात्मक, व्यावसायिकता व सहकार्याची भावना दर्शवणारा ठरल्याचे मत कायदेवर्गातून व्यक्त करण्यात आले.
निवडून आलेल्या पदाधिकार्यांनी सोमवारी (दि. 1) लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. मनोज भुजबळ हे पनवेलमधील ज्येष्ठ व अत्यंत अनुभवी वकील असून या क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. नवी कार्यकारिणी त्यांच्या सल्ल्याचा लाभ घेत संघटनेला अधिक सक्षम करेल, असे मत या वेळी पनवेल बार असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष रत्नदीप पाटील यांनी व्यक्त केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. त्यानुसार नव्या पदाधिकार्यांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper