Breaking News

बिग बॉस 19 फिनालेमध्ये खारघरच्या प्रणित मोरेला विजेता करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो असलेल्या बिग बॉस 19 सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक प्रणित मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.
स्थानिक पातळीवरून पुढे येत राज्यभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या प्रणित मोरे यांनी आपल्या शांत, संयमी आणि सकारात्मक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात विशेष ठसा उमटवला आहे. देशभरात प्रचंड लोकप्रिय असलेल्या या हिंदी रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रणित हा एकमेव मराठी स्पर्धक असून तोही आपल्या खारघरचा असल्यामुळे संपूर्ण पनवेल, खारघरसह नवी मुंबई परिसरासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.
ग्रँड फिनालेसाठीचे मतदान सध्या सुरू झाले असून 6 डिसेंबरपर्यंत हे मतदान चालू राहणार आहे. नागरिकांनी स्वतः तसेच मित्र-परिवारासह प्रणित मोरे यांना मतदान करून त्यांना बिग बॉसचा विजेता बनवावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
प्रणित मोरे हा आपल्या परिसराचा अभिमान आहे. त्याने बिग बॉसमध्ये प्रामाणिक, सुसंस्कृत व सकारात्मक खेळ सादर केला. त्याच्या मेहनतीला आणि प्रामाणिकतेला आपण सर्वांचा भरभरून पाठिंबा मिळायला हवा. फिनालेतील त्याचा विजय हा आपल्या सर्वांचा विजय ठरेल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन प्रणितला बिग बॉस बनवावे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले आहे.
बिग बॉस या हिंदी शोने संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. आपल्या पनवेल, खारघर, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात या इंड्रस्टीचे लोकं आणि चाहते आहेत. त्यामुळे आपला प्रणित मोरे बिग बॉस झाला पाहिजे यासाठी नक्कीच प्रत्येक जण योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply