Breaking News

हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या चमूला सात पारितोषिके

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 64वी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा ठाणे केंद्रावर झाली. या स्पर्धेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे सारिका ढेरंगे लिखित आणि अभिजित झुंझारराव दिग्दर्शित सादर झालेल्या नारायणी या दोन अंकी नाटकाला सात पारितोषिक प्राप्त झाली आहेत.
स्पर्धा डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह घोडबंदर येथे झाली. या स्पर्धेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या नारायणी या नाटकाने सात पारितोषिके मिळविली आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी श्याम चव्हाण (प्रथम), वेशभूषा आणि रंगभूषा रितूपर्ण कीर्तोनिया (द्वितीय), संगीत गणेश जगताप (द्वितीय), नेपथ्य रितू, रोहित, आर्यन (तृतीय) तसेच सानिका पाटील व क्षितिज गायकवाड (गौरव प्रमाणपत्र) यांना पारितोषिके मिळाली. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कलाकारांच्या पाठीशी नेहमी उभे असणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि मंडळाचे सचिव व नाट्य परिषद उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी या स्पर्धेसाठी कलाकारांना प्रोत्साहन दिले होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply