पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9मधील शेकापच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
प्रभाग क्रमांक 9 मधील शेकापचे खंदे कार्यकर्ते संदीप नाईक आणि श्री. नाईक यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतल. या पक्षप्रवेशकर्त्यांचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रभूदास भोईर, पनवेल शहर उपाध्यक्ष प्रितम म्हात्रे, सरचिटणीस रूपेश नागवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper