Breaking News

रायगड जि.प., पनवेल पं.स. निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून येत्या यासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 20) आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे आणि राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.
या वेळी उमेदवारांसोबत आमदार प्रशांत ठाकूर, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नगरसेवक शशिकांत शेळके, नगरसेविका प्रतिभा भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह कृष्णा पाटील, संतोष पाटील, शिवाजी दुर्गे, महेश पाटील, विजय मुरकुटे, डॉ. संतोष आगलावे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, विद्याधर मोकल, विद्याधर जोशी तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्यासाठी पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ढोल-ताशाच्या गजरात व घोषणा देत रॅली काढण्यात आली. ही रॅली पनवेल तहसीलदार कार्यालयात पोहचून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश वाकडीकर, वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून कमला देशेकर यांनी, वावंजे पंचायत समिती गणासाठी आरती कुणाल काटे, चिंध्रण पंचायत समिती गणातून अंकुश खेर यांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील उमेदवार बुधवारी (दि. 21) अर्ज दाखल करणार आहेत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी असून 22 जानेवारीला छाननी होणार आहे. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी पनवेल शहरातील व्ही.के. हायस्कूल येथे होणार आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply