पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर वडघर जिल्हा परिषद गट आणि करंजाडे पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी बुधवारी नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार करण्यात आला.
भाजपच्या कल्याण पूर्व मतदार संघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रचारात महायुतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला. या वेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आमदार सुलभा गायकवाड यांनी महायुतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या विकासकामांचा पाढा वाचला आणि वडघर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सोनाली जितेकर तसेच करंजाडे पंचायत समिती गणाच्या उमेदवार रंजना वास्कर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
या प्रचार दौर्यात भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शन भोईर, प्रतिभा भोईर, अस्मिता घरत, उद्योजक गुरुनाथ पाटील, सरपंच सदाशिव वास्कर, विजेता भोईर, मनोहर भोईर, उपसरपंच विक्रम फडके, संदेश पाटील, माजी सरपंच अविनाश हुद्दार, कल्पेश पाटील आदी सहभागी झाले होते.
Check Also
सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मकउपाययोजना करा -आमदार प्रशांत ठाकूर
लवकरच महा सायबर सेफ अॅप सुरू होणार -मंत्री योगेश कदम पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यात वाढत्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper